कोरोना रॅपिड मॉनिटरिंग टीमचे शासकीय योजनांवर लक्ष! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 04:45 PM2020-04-15T16:45:41+5:302020-04-15T16:45:49+5:30

नेशनल दलित फॉर मूव्हमेंट जस्टीस या संघटनेने कोरोना रेपिड मॉनिटरिंग टीम गठित करून सर्वेक्षण अँपद्वारे लक्ष ठेवणे सुरू केले आहे.

corona rapid Monitaring team wathch on government scheme | कोरोना रॅपिड मॉनिटरिंग टीमचे शासकीय योजनांवर लक्ष! 

कोरोना रॅपिड मॉनिटरिंग टीमचे शासकीय योजनांवर लक्ष! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने देशभरात ३ मे पर्यंत लॉक डाउन वाढविला आहे. या संकट काळात गोरगरीबांना धान्यासह इतरही सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या योजनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी नेशनल दलित फॉर मूव्हमेंट जस्टीस या संघटनेने कोरोना रेपिड मॉनिटरिंग टीम गठित करून सर्वेक्षण अँपद्वारे लक्ष ठेवणे सुरू केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पाय पसरत असून कोरोना बाधित लोकांची संख्या ११ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ३ मे पर्यंत लॉक डाउन वाढविला आहे. या काळात गोरगरीब कुटुंबांना मोफत तांदूळ पुरविला जाणार आहे. यासह जनकल्याणाच्या इतरही योजना राबविण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही, गरजू कुटुंबांना लाभ मिळण्यात कुठल्या अडचणी निर्माण होत आहेत, यावर लक्ष ठेवण्यासाठी नेशनल दलित फॉर मूव्हमेंट जस्टीस या संघटनेने 'वुई क्लेम' नावाचे अँप तयार करून याद्वारे सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. त्याचा आढावा येत्या १८ एप्रिलला घेऊन अहवाल केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
कोरोनाच्या संकट काळात 'वुई क्लेम' या अँपच्या माध्यमातून शासकीय योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. या मोहिमेच्या यशासाठी 'एनडीएमजे'चे राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश नाथन आणि राज्य सचिव डॉ. केवल उके प्रयत्न करीत आहेत.
- पुंजाजी खंदारे
राज्य सहसचिव, एनडीएमजे

Web Title: corona rapid Monitaring team wathch on government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.