बसमध्ये कोरोनाविषयक नियम धाब्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:53+5:302021-04-24T04:41:53+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी संदर्भातील निर्बंध आणखी कठोर केले आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये राज्य ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी संदर्भातील निर्बंध आणखी कठोर केले आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये राज्य शासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेता येतील. कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही, असे संचारबंदीच्या नियमावलीत स्पष्ट नमूद आहे. पहिल्याच दिवशी मालेगाव येथे या नियमावलीला धाब्यावर बसविण्यात आले असून, ५० टक्के पेक्षा अधिक प्रवाशी बसमध्ये घेतले तसेच काही प्रवाशी जागा नसल्यामुळे उभे असल्याचे दिसून आले. बसमध्ये चढताना कोणत्याही प्रकारे तपासणी केली जात नसल्याचेही यावेळी दिसून आले. यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संचारबंदीच्या नवीन नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी संबंधित बसच्या चालक व वाहकांनी करणे अपेक्षीत असताना, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मालेगाव येथे शुक्रवारी दिसून आले.