शिवजयंती उत्सवावर कोरोनाचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:16 AM2021-02-18T05:16:55+5:302021-02-18T05:16:55+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार ...

Corona saves on Shiv Jayanti celebrations! | शिवजयंती उत्सवावर कोरोनाचे सावट !

शिवजयंती उत्सवावर कोरोनाचे सावट !

Next

छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. कोविड- १९ मुळे उद्‌्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर मर्यादा आल्या. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. तसेच कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मोटारसायकल रॅली, मिरवणूक काढू नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.

बॉक्स

आरोग्यविषयक शिबिराला प्राधान्य द्यावे !

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर आदी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद आहे.

Web Title: Corona saves on Shiv Jayanti celebrations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.