ग्रामपंचायत निवडणुकीत १४६० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; अहवाल प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:14 PM2021-01-11T12:14:56+5:302021-01-11T12:17:37+5:30

Gram Panchayat elections एकूण ३ हजार जणांची कोरोना चाचणी ९ जानेवारीपासून केली जात आहे.

Corona test of 1460 employees in Gram Panchayat elections; Awaiting report! | ग्रामपंचायत निवडणुकीत १४६० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; अहवाल प्रतीक्षेत!

ग्रामपंचायत निवडणुकीत १४६० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; अहवाल प्रतीक्षेत!

Next
ठळक मुद्देरविवारपर्यंत १,४६० जणांची चाचणी करण्यात आली.एक किंवा दोन दिवसात अहवाल येण्याचा अंदाज आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून मतदान केंद्रात नियुक्त ३ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. रविवार, १० जानेवारीपर्यंत १,४६० जणांची चाचणी झाली असून, एक किंवा दोन दिवसात अहवाल येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ७०० मतदान केंद्रे असून एका केंद्रावर प्रत्येकी चार अधिकारी, कर्मचारी व अतिरिक्त २०० अधिकारी, कर्मचारी, असे एकूण ३ हजार जणांची कोरोना चाचणी ९ जानेवारीपासून केली जात आहे. रविवारपर्यंत १,४६० जणांची चाचणी करण्यात आली.

१३ जानेवारीपर्यंत उमेदवारांची चाचणी
जिल्ह्यातील २५२ सदस्य अविरोध झाल्याने उर्वरित १,२३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. १,२३५ जागांसाठी ३,२२६ उमेदवार नशीब आजमावत असून, या उमेदवारांनी १० ते १३ जानेवारीपर्यंत कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांनी कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे गरजेचे आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणार काळजी
मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. उमेदवार व मतदान केंद्रातील प्रतिनिधींनीदेखील कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदानाच्या दिवशी केंद्रात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या मतदाराला मतदान करता यावे म्हणून पीपीइ किट व आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरच सर्वात शेवटी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 

Web Title: Corona test of 1460 employees in Gram Panchayat elections; Awaiting report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.