एकलासपूर येथील ७० जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:42+5:302021-05-13T04:41:42+5:30
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील एकलासपूर येथे १० मे रोजी एकाच ...
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील एकलासपूर येथे १० मे रोजी एकाच दिवशी ७० जणांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला.
एकलासपूरचे सरपंच किसन कुलाळ, उपसरपंच हिना परवीन सै शकील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अमोल कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष खुशाल कुलाळ, माजी पंचायत समिती सदस्य द्वारकाबाई अशोक कुलाळ, तलाठी आर. आर. शिंदे, कोतवाल स्वाती डहाळके, ग्रामसेवक एम. बी. देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चुंगडे, डॉ. पिसे, आरोग्यसेविका सुनीता खंडागळे, मनिषा खंडागळे, आशा सेविका ज्योतिबाई देवकर आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी रिसोडचे विस्तार आधिकारी बी. एस. साबळे व जे. जी. लोणकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दुकाने बंद ठेवून निर्बंधाचे पालन करावे. घरपोच सेवा सुरू ठेवण्यास हरकत नाही; मात्र नियम तोडू नये. प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.