कोरोना चाचणी करून घेण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:41 AM2021-03-21T04:41:04+5:302021-03-21T04:41:04+5:30
या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, ...
या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट लॉज यासह इतर सर्व खाजगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना चाचणी केली नसल्यास त्यांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे
वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व तुळजा भवानी मंगल कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपी, कामरगाव व अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड (ता. रिसोड) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह आणि जिल्ह्यातील सर्व २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.