सर्दी, ताप, खोकला असल्यास कोरोना चाचणी होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:23 PM2020-06-03T16:23:40+5:302020-06-03T16:23:45+5:30

ताप, सर्दी आणि खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २ जून रोजी घेतला.

Corona test if you have a cold, fever, or cough | सर्दी, ताप, खोकला असल्यास कोरोना चाचणी होणार 

सर्दी, ताप, खोकला असल्यास कोरोना चाचणी होणार 

Next


वाशिम : कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान होउन रुग्णावर योग्य उपचार झाल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी ताप, सर्दी आणि खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २ जून रोजी घेतला. त्यामुळे ही लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येवून आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. 
परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने मजूर, कामगार जिल्ह्यात परतत आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. परंतू, धोका अजून संपलेला नसल्याने जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच मजूर, कामगारांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे दिसून येतात. या आजारावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे असणाºया व्यक्तींची कोरोना विषयक तपासणी करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आले. त्यामुळे ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तपासणीसाठी इतर ठिकाणी न जाता आपल्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मोडक यांनी केले.
 
खासगी डॉक्टर, ग्राम स्तरीय समित्या देणार माहिती

कोरोना विषाणू संसर्गाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी व खोकल्याचा समावेश आहे. अशी लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही लक्षणे असलेली व्यक्ती खासगी डॉक्टरांकडे आल्यास त्यांना नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणीसाठी पाठवावे. तसेच संबंधित रुग्णाची माहिती आरोग्य यंत्रणेला कळवावी. ग्रामस्तरीय समिती व शहरातील वार्डस्तरीय समित्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास असल्यास त्यांना नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी पाठवावे. तसेच सदर व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला कळवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या.
 
सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असणाºया रुग्णांची स्वतंत्र तपासणी व्हावी याकरीता प्रत्येक तालुक्यात ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. अशी लक्षणे आढळून येणाºया नागरिकांनी अन्य रुग्णालयात न जाता फिव्हर क्निनिकमध्ये जावे. 
- ऋषिकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Corona test if you have a cold, fever, or cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.