विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:30+5:302021-05-06T04:43:30+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही, नागरिक हे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मास्कचा वापर, फिजिकल ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही, नागरिक हे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करूनही याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी कशी तुटणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयानुसार विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. शेलुबाजार येथे ग्रामपंचायत व पोलीस विभागाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रशांत महाकाळ, वाहतूक शिपाई नारायण शिंदे, ग्रामविकास अधिकारी दीपा सुर्वे, पांडुरंग कोठाळे, बाबाराव पवार, ग्राम कर्मचारी गौतम गवई, अमोल दुबे, रोशन गावंडे, रामा वाडेकर, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंगरुळपीर गटविकास अधिकारी हरिनारायण परीहार , गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी भेट दिली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात वारंवार धुवावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणेने केले आहे.