मालेगावात व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:39+5:302021-05-24T04:39:39+5:30
नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत अधिकारी, कर्मचारी व ...
नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत अधिकारी, कर्मचारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविले आहे.
काही दिवसांपूर्वी गांधी चौकात कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी एकूण १२३ व्यापारी व फेरीवाल्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सुदैवाने त्यातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले होते. तशीच मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली असून, यावेळी दुकानांमधील कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांवरही विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
............
कोट :
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या अवधीत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. संबंधित दुकानदारांनी स्वत:सोबतच त्यांच्या दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करून घ्यावी. अटी व नियमांचे पालन करूनच दुकान सुरू ठेवावे आणि होणारी कारवाई टाळावी.
- डॉ. विकास खंडारे
मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव