मतदान ड्युटीला जाताना कोरोना टेस्ट; मग परतल्यावर का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:38+5:302021-01-18T04:36:38+5:30
................... १५२ निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती २५५० निवडणुकीसाठी कर्मचारी २५५० जणांची जाण्यापूर्वी चाचणी झाली .................. तीन कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया मतदान केंद्रावर ...
...................
१५२
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती
२५५०
निवडणुकीसाठी कर्मचारी
२५५०
जणांची जाण्यापूर्वी चाचणी झाली
..................
तीन कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया
मतदान केंद्रावर ड्युटीला जाण्यापूर्वी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार, टेस्ट करून घेतली. परंतु ड्युटीवरून परतल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्याचे कुठलेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
- रवींद्र वानखडे, कर्मचारी
.......................
पोलीस कर्मचाऱ्यांवर मतदान केंद्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोणत्याही मतदाराशी प्रत्यक्ष संपर्क आलेला नाही. त्यामुळे ड्युटीवर जाताना किंवा परतल्यानंतर कोरोना टेस्ट करून घेण्याचे वरिष्ठांचे आदेश नाहीत.
- विजय अरखराव, कर्मचारी
..................
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुथवर ड्युटी लागली होती. त्यापूर्वी कोरोना टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. ड्युटीवरून परतल्यानंतर मात्र पुन्हा कोरोना टेस्ट करण्याच्या कुठल्याही सूचना वरिष्ठांकडून मिळालेल्या नाहीत.
- अनिल पाटील, कर्मचारी