परजिल्ह्यातून परतलेल्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:58+5:302021-02-23T05:01:58+5:30

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी ...

Corona testing is mandatory for returnees from the district | परजिल्ह्यातून परतलेल्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

परजिल्ह्यातून परतलेल्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

Next

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांवर लवकर उपचार सुरू होतील व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे, अशा जिल्ह्यात प्रवास करून आलेल्या किंवा वास्तव्य करून आलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून कोरोना चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

...............

बॉक्स :

लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करून घ्या

कोरोना संसर्गाचे वेळेत निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याउलट निदान व उपचारास विलंब झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यांसारखी लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

...................

बॉक्स :

कोविड केअर सेंटरमध्ये चाचण्यांची सुविधा

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, त्याठिकाणीसुद्धा कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Corona testing is mandatory for returnees from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.