उंबर्डा बाजार येथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:48+5:302021-03-07T04:38:48+5:30
उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात शनिवारी सकाळी ९ ते ५ या दरम्यान गावातील पानटपरी, चहाची टपरी, हाॅटेल, कापड दुकान, कटलरी ...
उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात शनिवारी सकाळी ९ ते ५ या दरम्यान गावातील पानटपरी, चहाची टपरी, हाॅटेल, कापड दुकान, कटलरी दुकान, किराणा दुकानासह इतर व्यावसायिक मिळून एकूण १०५ व्यावसायिकांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाने केली. उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांची कोरोना चाचणी मोहीम यशस्वीपणे पार पडली.
----------------
ग्रामस्तर समितीकडून गावात पाहणी
उंबर्डा बाजार : वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशान्वये उंबर्डा बाजार येथे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने शनिवारी गावात फेरी मारून व्यावसायिक आणि ग्रामस्थ कोरोना विषयक नियमांचे पालन करीत आहेत की नाही, याचा आढावा घेतला.
या पथकात उंबर्डा बाजाराचे ग्रामसचिव, तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसह पोलीस पाटील सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर ग्राम सचिवांनी दंडात्मक कारवाई केली आहे.