कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:43+5:302021-06-23T04:26:43+5:30
वाशिम : कोेरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबणे आवश्यक आहे ; परंतु अनेकजण लस घेतल्यानंतर ...
वाशिम : कोेरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबणे आवश्यक आहे ; परंतु अनेकजण लस घेतल्यानंतर घराचा रस्ता धरतात. त्यामुळे लसीची काही अॅलर्जी आहे की नाही, याची माहिती मिळू शकत नाही. लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंट लाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. लसीचा तुटवडा असल्याने १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. १९ जूनपासून ३० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, सहा ग्रामीण रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात आहे. लस घेताना आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्याचा सल्ला दिला जातो. परंतु , अनेकजण लस घेतल्यानंतर पाच मिनिटात केंद्र सोडून घरचा रस्ता धरतात.
०००००००
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लस घेतल्यानंतर काही अॅलर्जी, दुष्परिणाम तर जाणवत नाहीत ना? हे पाहण्यासाठी लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे आवश्यक आहे. अर्ध्या तासात दुष्परिणाम समजू शकतात. यावेळेत काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेता येतात. लसीची अॅलर्जी असलेल्यांमध्ये ‘अॅनाफिलॅक्सिस’ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर पुढील अर्धा तास महत्त्वाचा असतो.
००००००००००
लस हेच औषध
कोरोनावर सध्यातरी हमखास उपचार नाहीत. कोरोनापासून बचाव म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसीमुळे अॅंटिबॉडी तयार होते. रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना संसर्ग झाला तरी गंभीर लक्षणे आढळून येत नाहीत. कोरोनावर लस हेच प्रभावी औषध असल्याने प्रत्येक पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००
कोट बॉक्स
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात किमान अर्धा तास थांबणे आवश्यक आहे. तशा सूचनाही सर्वांना दिल्या आहेत. या अर्ध्या तासात अॅलर्जी, काही दुष्परिणाम तर झाले नाहीत ना? याची माहिती मिळू शकते.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.
०००००
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण लसीकरण २,८०,६३५
पहिला डोस २,०८,८४३
दुसरा डोस ७,१,७९२
...
लसीकरण केंद्र
एकूण केंद्राची संख्या १३०
३० ते ४४ वयोगटासाठी ३३