कोरोना लसीकरण:  वाशिम जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:53 AM2021-02-14T11:53:03+5:302021-02-14T11:53:18+5:30

CoronaVaccination लस घेण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत. 

Corona vaccination: Police personnel at the forefront in Washim district | कोरोना लसीकरण:  वाशिम जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर

कोरोना लसीकरण:  वाशिम जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, दुस-या टप्प्यात गत १३ दिवसांपासून अन्य शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचा-यांना लस दिली जात आहे. लस घेण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत. 
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणा-या कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस दुस-या टप्प्यात जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. दुस-या टप्प्यात पोलीस, महसूल, नगर परिषद व नगर पंचायतीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. पोलीस विभागातील २१२७, नगर परिषद व नगर पंचायत विभागातील ६३६, महसूल विभागातील ९१० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. 

आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस 
पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या अधिकारी, कर्मचा-यांना १४ फेब्रुवारीपासून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.


जि.प. अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८६० जणांची नोंदणी झाली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या अधिकारी, कर्मचा-यांचे पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.


दुस-या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस उपलब्ध झाले असून १४, १५ फेब्रुवारीपासून आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
- डॉ. मधुकर राठोड, 
जिल्हा शल्यचिकित्सक वाशिम

Web Title: Corona vaccination: Police personnel at the forefront in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.