तांत्रिक कारणामुळे कोरोना लसीकरण दोन दिवस लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:53 AM2021-01-18T11:53:44+5:302021-01-18T11:53:58+5:30

Corona Vaccine News लसीकरण मोहीम १९ जानेवारीपासून पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

Corona vaccination postponed for two days due to technical reasons | तांत्रिक कारणामुळे कोरोना लसीकरण दोन दिवस लांबणीवर

तांत्रिक कारणामुळे कोरोना लसीकरण दोन दिवस लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारीला झाला असून, तांत्रिक कारणामुळे रविवार व सोमवार या दोन दिवशी लसीकरण होणार नाही. १८ जानेवारीला वरिष्ठ स्तरावरून ‘व्हिडिओ काॅन्फरन्स’ झाल्यानंतर लसीकरण मोहीम १९ जानेवारीपासून पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीला जिल्ह्यात वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रात प्रत्येकी १०० असे एकूण ३०० लाभार्थींना लस देण्याचे नियोजन होते. परंतु, प्रत्यक्षात १६७ जणांनाच लस देण्यात आली. काहीजण नियोजित ठिकाणी हजर होऊ शकले नाहीत, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण मोहिमेत व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, रविवार, १७ जानेवारी रोजीदेखील तांत्रिक अडचण दूर झाली नाही. कोविन ॲप आणि अन्य आनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहीम लांबणीवर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 
 
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने दोन दिवस (दि.१७ व १८ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी ‘व्हीसी’ होणार आहे. तांत्रिक समस्या निर्माण होणे, हा प्रश्न सर्वत्रच असून, १९ जानेवारीपासून मोहिम पूर्ववत होइल.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Corona vaccination postponed for two days due to technical reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.