जिल्ह्यात कोरोना लसी निकामी होण्याचे प्रमाण केवळ ०.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:18+5:302021-08-14T04:46:18+5:30

वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही ...

Corona vaccine failure rate in the district is only 0.64% | जिल्ह्यात कोरोना लसी निकामी होण्याचे प्रमाण केवळ ०.६४ टक्के

जिल्ह्यात कोरोना लसी निकामी होण्याचे प्रमाण केवळ ०.६४ टक्के

Next

वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही फार चिंताजनक स्थिती नसून, वाशिमप्रमाणेच अनेक जिल्ह्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण वजामध्ये (मायनस) आहे. कारण लसीच्या एका वायल्समध्ये १० ऐवजी ११ ते १३ डोस आले. परिणामी, अनेक जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण होत आहे.

लसींचे ‘वेस्टेज मायनस’

एका वायलमधून दहा जणांना डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही वायल्समधून ११, १२ तर कधी १३ जणांचे लसीकरण होते.

कारण वायल्समध्ये जास्त लस येते. तेव्हा ही संख्या लसीच्या वेस्टेजमध्ये वजा (मायनस) म्हणून पकडली जाते.

----------

वाशिम जिल्ह्यात २७०२ डोस निकामी

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर ११ ऑगस्टपर्यंत लसींची साठवणूक आणि वापराचे प्रभावी आणि अचूक नियोजन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या खबरदारीमुळे एकूण ५,२९,२८० डोसपैकी केवळ २७०२ डोस निकामी झाले आहेत. एक वायल वापरात घेतल्यानंतर लसीसाठी अपेक्षित प्रमाणात नागरिक न आल्याने हा प्रकार घडला.

जिल्ह्यात प्राप्त एकूण डोस - ५,२९,२८०

झालेले लसीकरण-५,१९,४०५

००००००००

प्रकार निहाय प्राप्त आणि झालेले लसीकरण

कोविशिल्ड-

प्राप्त डोस -२,८८,७२०, झालेले -२,८८,६३९, निकामी झालेले -२१५

००००००००

कोव्हॅक्सिन-

प्राप्त डोस -२,१०,५६०, झालेले -२,०३,८५७, निकामी झालेले - २४८७

००००००००

समता फाउंडेशन -

प्राप्त डोस -३०,०००, झालेले - २६,९०९, निकामी झालेले ००

००००००००

Web Title: Corona vaccine failure rate in the district is only 0.64%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.