Corona Vaccine News : १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सना मिळणार काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:36 AM2021-01-13T11:36:06+5:302021-01-13T11:36:44+5:30

Corona Vaccine News: १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. 

Corona Vaccine News: Frontline workers to get Corona vaccine from January 16 | Corona Vaccine News : १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सना मिळणार काेराेना लस

Corona Vaccine News : १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सना मिळणार काेराेना लस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  कोरोना लस उपलब्ध झाली असून, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून  सेवा बजावणाऱ्या डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. 
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला.  नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. कोरोना लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सरकारी  व खासगी क्षेत्रातील ५५०० वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूक्ष्म नियोजन व डाटा अपलोड केला आहे. कोरोना लसीकरणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, कोविड ॲपमध्ये सर्वांची एन्ट्री केली आहे. त्यानुसार सरकारी डाॅक्टर, कर्मचारी आणि त्यानंतर खासगी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. 


नोंदणीनुसार प्रत्येक केंद्रात १०० जणांना लस
कोरोनाची लस फ्रंटलाइन वर्कर्स यांना देण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाइलवर संदेश आल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन लस दिली जाणार आहे. एका दिवशी एका केंद्रात जवळपास १०० जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.


लसीकरण कोणाला व कधी?
पहिल्या टप्प्यात सुरुवातीला सरकारी डाॅक्टर, कर्मचारी, खासगी डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचारी या फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेली असून, मोबाइलवर संदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना संबंधित केंद्रात जावे लागणार आहे.


कोणत्या बूथवर दिली जाणार लस?

  • जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे पहिल्या टप्प्यात वाशिम व मालेगाव तालुक्यातील संबंधितांना कोरोना लस देण्यात येणार आहे. 
  • कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कारंजा तालुक्यातील फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
  • रिसोड, मानोरा व मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय येथे त्या त्या तालुक्यातील फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

 

फ्रंट लाइन वर्कर्स यांना पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि रिसोड, मानोरा व मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय अशी पाच केंद्र निश्चित करण्यात आलेली असून, संबंधितांनी नोंदणीदेखील केली आहे.
    - डाॅ. मधुकर राठोड,
    जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Corona Vaccine News: Frontline workers to get Corona vaccine from January 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.