सीईओंनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:31 AM2021-02-22T04:31:05+5:302021-02-22T04:31:05+5:30
००० निवडपात्र शेतकºयांनी कागदपत्रे सादर करा! वाशिम : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी लॉेटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोंदणीकृत ...
०००
निवडपात्र शेतकºयांनी कागदपत्रे सादर करा!
वाशिम : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी लॉेटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. संदेश प्राप्त होताच शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
००००
आरोग्य अधिकाºयांनी घेतला आढावा
वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डावरे यांनी रविवारी आरोग्य कर्मचाºयांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, आरोग्यविषयक सेवा आदीबाबत त्यांनी सूचना केल्या.
०००००
केनवड येथे आरोग्य तपासणी !
केनवड : सावधगिरीचा उपाय म्हणून केनवड आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे परिसरात आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. गत चार दिवसांत जवळपास ८६० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.