सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:11 AM2021-03-02T11:11:35+5:302021-03-02T11:11:42+5:30

CoronaVaccination in Washim जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली.

Corona vaccine was given to 90 seniors in six centers in Washim | सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस

सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस

googlenewsNext

 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ, अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली.
१ मार्चपासून ६०  वर्षांवरील ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला देशभरात प्रारंभ झाला. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि रिसोड, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय अशा सहा शासकीय केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले. पहिल्या दिवशी सुरुवातीला ॲपवर नोंदणी करताना अडचणी जाणवल्या. त्यामुळे काही वेळ ज्येष्ठांना  ताटकळत बसावे लागले. ॲप अद्ययावत होण्याला विलंब झाल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ९० ज्येष्ठांनी नोंदणी केली असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली.


१ मार्चपासून  ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५  वर्षांवरील तिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील सहा शासकीय केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली. लस ही पूर्णत: सुरक्षित असून, इतरांनीदेखील घ्यावी.
- डाॅ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Corona vaccine was given to 90 seniors in six centers in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.