CoronaVirus in Washim : आणखी ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:29 AM2020-08-08T11:29:06+5:302020-08-08T11:29:30+5:30
शुक्रवारी आणखी ५७ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले.
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रादूर्भावाचे प्रमाण वाढतच आहे. त्यात शुक्रवारी आणखी ५७ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले.
आरोग्य विभागाला गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १, रिसोड येथील जिजाऊ नगर परिसरातील २, गोवर्धन येथील १, शेलू खडसे येथील १, हराळ येथील १, वाशिम येथील सुदर्शन नगर परिसरातील ३, सुंदरवाटिका येथील ५, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, काळे फाईल येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील १, माळीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, दादगाव येथील १, कामरगाव येथील ४, भामदेवी येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट आॅफिस मागील परिसरातील १, शेलूबाजार येथील २, कवठळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील १, देवगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील बालाजी टॉकिज परिसरातील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, कवठळ येथील ४, मंगळसा येथील १, कारंजा लाड शहरातील स्वस्तिक नगर येथील ३, चावरे लाईन परीसारतील २, गवळीपुरा येथील १, आखतवाडा येथील १, सोहोळ येथील १, कामरगाव येथील ५, शेवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८७० झाली असून, त्यापैकी ४९१ लोकांना डिश्चार्ज देण्यात आला आहे, तर ३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
२१ व्यक्तींना डिस्चार्ज
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या शेलूबाजार येथील १, मालेगाव शहरातील अकोला नाका परिसरातील १, वाशिम शहरातील नर्सिंग कॉलेज परिसरातील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १२, पठाणपुरा येथील २, मांगवाडी येथील ४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.