CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:01 AM2020-06-09T11:01:29+5:302020-06-09T11:01:36+5:30

एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत.

Corona Virus in Washim: 72,000 citizens 'quarantined' free! | CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात परतलेले ३१ हजार आणि लॉकडाऊननंतर ते ८ जूनपर्यंत परतलेल्या ४७३५२ अशा एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने अशा नागरिकांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने मार्च महिन्यापासून देशासह राज्यात धुमाकूळ घातला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन लावला. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले होते. या नागरिकांना होम क्वारंटीन केले होते. यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्याने १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २४ मार्च ते ८ जून २०२० या कालावधीत ४७ हजार ३५२ नागरिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस क्वारंटीन केले. यापैकी ४१८४० नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपला असून, सध्या ५५१२ नागरिक क्वारंटीन आहेत. दुसºया टप्प्यात वाशिम तालुक्यात ६२६१ नागरीक परतले. यापैकी ५९८१ जण क्वारंटीनमुक्त झाले असून, सध्या २८० नागरिकांना क्वारंटीन आहेत. कारंजा तालुक्यात५८५३ नागरीक परतले. यापैकी ४३३४ जण क्वारंटीनमुक्त असून, १५१९ नागरिकांना क्वारंटीन आहेत.
मालेगाव तालुक्यात ६९४३ नागरीक परतले. यापैकी ४७२० जण क्वारंटीनमुक्त असून, २२२३ नागरिकांना क्वारंटीन आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ५७६४ नागरीक परतले. यापैकी ५२३० जण क्वारंटीनमुक्त असून, ५३४ नागरिक क्वारंटीन आहेत.
रिसोड तालुक्यात १३७७६ नागरीक परतले आहेत. यापैकी १३०८८ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या ६८८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नागरीक रिसोड तालुक्यात परतले असून, तेथे विशेष दक्षता घेतली जात आहे.
 

मानोरा तालुक्यात २६८ जण क्वारंटीन
मानोरा तालुक्यात ७५५ नागरीक परतले आहेत. यापैकी ८४८७ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या २६८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.

कठोर अंमलबजावणी
क्वारंटीन असलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये अन्यथा गुन्हे दाखल केली जातील, असे निर्देश असून याची अंमलबजावणी सुरू असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.

 

Web Title: Corona Virus in Washim: 72,000 citizens 'quarantined' free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.