इन्नाणी महाविद्यालयात कोरोना योद्धा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:09+5:302021-02-07T04:37:09+5:30
कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी.आर.राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कार्यक्रमाला तहसीलदार धीरज मांजरे, व्यवस्थापन समितीच्या उर्मिलाबाई ठाकूर, प्रकाश ...
कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी.आर.राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला तहसीलदार धीरज मांजरे, व्यवस्थापन समितीच्या उर्मिलाबाई ठाकूर, प्रकाश गोलेच्छा, उपप्राचार्य डाॅ. डी.आर.हळवे यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना शहरात व परिसरात अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून काम करणारे तहसीलदार धीरज मांजरे, डाॅ. अजय कांत, अनघा कांत, डाॅ. सुषमा उपाध्ये, डाॅ. संजय किटे, डाॅ. विजय जवाहरमलाणी, अशोक मानकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच काेरोना काळात मृत झालेल्या व्यक्तींना अंतिम संस्कार करणारे ऋषिकेश कामदार, नितीन जाधव, रोशन वानखडे, गौरव राऊत, लखन शिवहरे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर.एच.माथुरकर, प्रा.एन.जी.जाधव, प्रा.कु.एस.डी.वंजाळकर, यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यानंतर युवक बिदादरीत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी चमू व अमित मिरजकर, सुमित भगत यासमवेत प्रा.व्ही.आर.ढेगळे यांचा ही सन्मान करण्यात आला. महाविद्यालयात प्रोफेसर पदावर पोहाेचलेले डाॅ.डी.आर.हळवे, डाॅ.आर.ए.गुल्हाणे, डाॅ. के.जी.राजपूत, डाॅ. आर.ए.पाटील व डाॅ. ए.एन.देवरे तसेच मनोहर राऊत, देवानंद बोंते, चंदन वासनिक यांचाही सन्मान करण्यात आला.