रोपवाटिका योजनेवर कोरोनाचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:32+5:302021-04-22T04:41:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रोपवाटिका योजनेसाठी जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर पूर्वसंमती देण्यात आली. ...

Corona's attack on nursery scheme! | रोपवाटिका योजनेवर कोरोनाचे सावट !

रोपवाटिका योजनेवर कोरोनाचे सावट !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रोपवाटिका योजनेसाठी जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर पूर्वसंमती देण्यात आली. परंतु, गत दोन महिन्यांपासून कोरोनाचे सावट असल्याने रोपवाटिकांची कामेही प्रभावित होत आहेत.

भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’ राबविली जात आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषी पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटाला प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी २ वर्षांचा असून, योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७ व अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता ३ अशा एकूण १० रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक असून, या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ रोपवाटिकेची निर्मिती होईल, यादृष्टीने नियोजन केले आहे. यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाशिम तालुक्यात २ तर उर्वरित पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मिती तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता मंगरूळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक दिला आहे. या योजनेंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लाख ३० हजार रुपये या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात देय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान व रोपांची विक्री सुरु झाल्यानंतर ४० टक्के अनुदान हे आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल. यासाठी नऊजणांची निवड होऊन पूर्वसंमतीही देण्यात आली. परंतु, कोरोनाचे सावट असल्याने कामे प्रभावित होत आहेत.

००००००००

तालुकानिहाय पूर्वसंमती मिळालेल्या रोपवाटिका

तालुकारोपवाटिका

वाशिम ०२

रिसोड ०१

मालेगाव ००

मं. पीर ०२

मानोरा ०२

कारंजा ०२

Web Title: Corona's attack on nursery scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.