‘वाशिम जिल्हा स्टार्टअप’ उपक्रमावर कोरोनाचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:44+5:302021-02-24T04:42:44+5:30
जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘व्यवसाय नियोजन ...
जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘व्यवसाय नियोजन स्पर्धा’ अर्थात ‘बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन करण्यात आले. यासाठी नोंदणीही केली जात आहे. आरोग्य, शेती, पर्यावरण, पर्यटन, सायबर सेक्युरिटी, शिक्षण व कौशल्य, प्रशासन व इतर विषयावर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना या स्पर्धेत मांडता येणार आहेत. तरुण संशोधक, वरिष्ठ संशोधक व तज्ज्ञ संशोधक अशा तीन गटात ही स्पर्धा विभागली जाणार आहे. तरुण संशोधक गटातील १० विजेत्यांना एकूण २ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे, वरिष्ठ संशोधक गटातील ५ विजेत्यांना एकूण १ लाख ५ हजार रुपयांची बक्षिसे, तज्ज्ञ संशोधक गटातील ५ विजेत्यांना एकूण २ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपये रक्कमेची ६ प्रोत्साहनपर पारितोषिकही देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी १५ मार्च २०२१ पर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ मार्च २०२१ रोजी होणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जमावबंदी आदेश लागू आहेत. मार्च महिन्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर ‘वाशिम जिल्हा स्टार्टअप’ उपक्रमही रद्द किंवा आॅनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.