‘कॅच द रेन’ मोहिमेवर कोरोनाचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:41+5:302021-03-01T04:48:41+5:30
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी वाचविणे काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा वापर जपून ...
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी वाचविणे काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा वापर जपून करण्यामध्ये युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ (पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत गावातील सुमारे शंभर कुटुंबांना छतावर पडणारे, शेतात पडणारे, तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने या मोहिमेवर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याचे दिसून येते.