कोरोनाचा कहर सुरूच; आणखी १४६ पाॅझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:34+5:302021-02-27T04:55:34+5:30

गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी काेरोनाचा उद्रेक कायम दिसून आला. शुक्रवारी आणखी १४६ जणांचा कोरोना चाचणी ...

Corona's havoc continues; Another 146 positives! | कोरोनाचा कहर सुरूच; आणखी १४६ पाॅझिटिव्ह!

कोरोनाचा कहर सुरूच; आणखी १४६ पाॅझिटिव्ह!

Next

गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी काेरोनाचा उद्रेक कायम दिसून आला. शुक्रवारी आणखी १४६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हिल लाइन्स येथील १, आययूडीपी येथील ४, नालंदानगर येथील १, आर. ए. कॉलेज जवळील १, शुक्रवार पेठ येथील १, महात्मा गांधी शाळेजवळील १, विनायकनगर येथील १, नगर परिषद परिसरातील १, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, देपूळ येथील १, खडकी काटा येथील १, अनसिंग येथील १, खंडाळा येथील १, ब्रह्मा येथील १, शेलू येथील १, ढिल्ली येथील १, मानोरा शहरातील एसबीआयजवळील ३, जनता बँकजवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, सोमनाथनगर येथील १, वसंतनगर येथील १, हिवरा येथील २, गव्हा येथील १, गुंडी येथील १, धामणी येथील १, सिंगडोह येथील १, म्हसणी येथील १, असोला येथील १, साखरडोह येथील १, पोहरादेवी येथील १, मालेगाव शहरातील ९, किन्हीराजा येथील ३, मालेगावनजीक किन्ही येथील १, कवरदरी येथील २, गणेशपूर येथील १, कुत्तरडोह येथील १, सोनाळा येथील १, मरडडोह येथील १, शिरपूर येथील १, मंगरूळपीर शहरातील मानोरा चौक येथील २, बायपास रोड परिसरातील २, बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, राधाकृष्ण कॉलनी येथील २, हाफिजपुरा येथील २, हरिकपुरा कॉलनी येथील २, आठवडी बाजार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, सोनखास येथील १, वनोजा येथील २, तऱ्हाळा येथील २, चहल येथील ४, धोत्रा येथील १, गोगरी येथील १, रिसोड शहरातील १, भरजहांगीर येथील ६, वाकद येथील १, बोरखेडी येथील १, मोप येथील १, कंकरवाडी येथील २, नंधाना येथील २, कारंजा शहरातील नगर परिषद कॉलनी येथील १, महावीर मार्ग येथील २, गौतमनगर येथील २, रेणुका हॉस्पिटल परिसरातील १, आदर्शनगर येथील १, बालाजी मंदिर येथील १, बाबरे कॉलनी येथील ५, कृष्णा कॉलनी येथील १, गुरू मंदिरजवळील ३, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, कानडीपुरा येथील १, तहसील कार्यालय परिसरातील २, नूतन कॉलनी येथील १, गांधी चौक येथील १, तळेगाव येथील १, लोहारा येथील १, पोहा येथील १, लोही येथील १, धामणी खडी येथील १, पिंपळगाव येथील १, जांब येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामठवाडा येथील १, धनज बु. येथील ३, नांगरवाडी येथील २, अंबोडा येथील ४, धोत्रा जहा. येथील ३, गिर्डा येथील १ बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८,६२१ वर पोहोचली असून, आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

............

१११३ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,६२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७,२४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत १,११३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Corona's havoc continues; Another 146 positives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.