कोरोनाचा धोका अजून टळला नाही, खबरदारी घ्यावी- वसुमना पंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:35 PM2021-06-03T18:35:44+5:302021-06-03T18:35:58+5:30

कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी केले.

Corona's threat is not over yet, be careful- Vasumana Pant | कोरोनाचा धोका अजून टळला नाही, खबरदारी घ्यावी- वसुमना पंत

कोरोनाचा धोका अजून टळला नाही, खबरदारी घ्यावी- वसुमना पंत

googlenewsNext

वाशिम : दुसºया लाटेत मे महिन्यापासून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, कोरोना लसीकरण यासह विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेत एका महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झालेल्या वसुमना पंत यांच्याशी गुरूवारी संवाद साधला. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी केले.

प्रश्न : जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात काय उपाययोजना करण्यात आल्या?

ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षता घेता ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहावे, अशा सूचना दिलेल्या आहेत.

प्रश्न : कोरोनामुळे विविध योजना राबविताना काय अडचणी येतात?

कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला सर्वाधिक प्राधान्य आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विकासात्मक कामेही रखडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जाते. कोरोनाविषयक नियमाचे पालन करीत ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रश्न : अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे मोठ्या संख्येत आहेत. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे का?

जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाºयांची महत्वाची पदे रिक्त आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाºयांची महत्वाची पदे भरण्यात यावी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जातो.

प्रश्न : ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाबाबत काय सांगाल?

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित व प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही गैरसमज न ठेवता, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. ग्रामीण भागात लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत.

Web Title: Corona's threat is not over yet, be careful- Vasumana Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.