मोहरमवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:41+5:302021-08-18T04:47:41+5:30
या आदेशानुसार मोहरम महिन्यात ९व्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी ‘कत्ल की रात’ आणि १०व्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्ट ...
या आदेशानुसार मोहरम महिन्यात ९व्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी ‘कत्ल की रात’ आणि १०व्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी ‘योम-ए-आशुरा’ येत आहे. यानिमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमही साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.