CoronaVirus : आणखी ४१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:32 AM2020-08-18T11:32:59+5:302020-08-18T11:33:08+5:30
कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२२७ झाली असून यापैकी ३८८ जण अॅक्टिव्ह आहेत.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२२७ झाली असून यापैकी ३८८ जण अॅक्टिव्ह आहेत.
आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी ४१ रुग्णांची भर पडली. मे महिन्यापर्यंत जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रित होती. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. १६ आॅगस्ट रोजी रात्री उशिराच्या अहवालानुसार २५ व १७ आॅगस्ट रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी ३ व्यक्ती असे २८ जण कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये वाशिम शहरातील जैन मंदिर परिसर, दंडे चौक येथील १, शिंपी गल्ली परिसर १, सुंदरवाटिका १, परळकर चौक १, लाखाळा परिसर ६, अनसिंग २, कोल्ही येथील २, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसर ३, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन परिसर १, मांडवा १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर २, संभाजी नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
रात्री ७ वाजताच्या अहवालानुसार १३ जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील चंडिका वेस परिसर १, गुरुवार बाजार परिसर १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसर १, कोल्ही २, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगरी परिसर १, शिवणी २, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसर २, सवड १, बेलखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
३९ जणांची कोरोनावर मात !
सोमवारी ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. १२२७ पैकी आतापर्यंत ८१९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.