CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५० पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४८८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:30 AM2020-07-25T11:30:59+5:302020-07-25T11:31:15+5:30
जिल्ह्यात आणखी ५० जणांना ्कोरोना संसर्ग झाला आहे.
वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. शुक्रवार २४ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आणखी ५० जणांना ्रकोरोना संसर्ग झाला आहे. आता एकूण रुग्णसंख्या ४८८ झाली आहे. सध्या २०३ जणांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाला गुरुवार २३ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५, शिक्षक कॉलनी परिसरातील १, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि वाशिम शहरातील विनायक नगर परिसरातील एका व्यक्तीचा समावेश होता. शुक्रवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील २३, मंगरूळपीर तालुक्यातील ३, रिसोड तालुक्यातील १३ आणि कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यात वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील २, गंगू प्लॉट ५, सोफीनगर १, शुक्रवार पेठ १, जानकी नगर ४, लाखाळा येथील ३ आणि सिंधी कॉलनी परिसरातील एका व्यक्तीसह कळंबा महाली येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी द. १, नांदगाव १, वनोजा येथील १ असे अशा एकूण ३ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. त्याशिवाय रिसोड तालुक्यातील रिसोड शहरातील पठाणपुरा १, आसन गल्ली १ आणि मांगवाडी येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
२९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सोमवार १९ जुलै ते गुरुवार २३ जुलैपर्यंत ८८ व्यक्तींनी कोरोना संसर्गावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शुक्रवारी आणखी २९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.