CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण वाढले; ४१ बरे झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:20 PM2020-10-16T12:20:41+5:302020-10-16T12:20:51+5:30

Washim Corona Update आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१४८ वर पोहचली आहे.

CoronaVirus: 52 patients increased in Washim district; 41 Healed! | CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण वाढले; ४१ बरे झाले!

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण वाढले; ४१ बरे झाले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात १५  ऑक्टाेबर रोजी दिवसभरात ५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५१४८  झाली आहे. दरम्यान ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना गुरूवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसून येते. १५ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील १, टिळक चौक येथील २, सुंदरवाटिका येथील १, अनसिंग येथील ५, बोरखेडी येथील १, चकवा येथील १, काटा येथील १, तांदळी येथील १, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर परिसरातील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, बियाणी नगर येथील १, रिसोड तालुक्यातील रिठद येथील १, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील संतोषी नगर येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे २, नाईक नगर येथील ४, दापुरा येथील ३, कोंडोली येथील १, कारंजा लाड शहरातील रेस्ट हाऊस जवळील १, शिव नगर येथील २, काजळेश्वर येथील १, वाल्हई येथील १, महागाव येथील २, पारवा कोहर येथील ७, शेवती येथील १ अशा ५२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१४८ वर पोहचली असून यापैकी ४४९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

Web Title: CoronaVirus: 52 patients increased in Washim district; 41 Healed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.