CoronaVirus : खासगी रूग्णवाहिकांचे होणार अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:58 AM2020-04-24T10:58:17+5:302020-04-24T10:58:31+5:30

कोरोना विषाणू संसर्गबाधित किंवा संदिग्ध असणाऱ्यांना तातड़ीने उपचाराखाली आणण्यासाठी खासगी रूग्णवाहिकांचेही अधिग्रहण करण्यात येणार आहे.

CoronaVirus: Acquisition of private ambulances | CoronaVirus : खासगी रूग्णवाहिकांचे होणार अधिग्रहण

CoronaVirus : खासगी रूग्णवाहिकांचे होणार अधिग्रहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असला तरी पुढील काळात कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना अडचणी येऊ नयेत म्हणून आवश्यक सर्व तयारी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग करीत आहे. यात कोरोना विषाणू संसर्गबाधित किंवा संदिग्ध असणाऱ्यांना तातड़ीने उपचाराखाली आणण्यासाठी खासगी रूग्णवाहिकांचेही अधिग्रहण करण्यात येणार आहे.
गत १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित रूग्ण न आढळलेल्या जिल्ह्याचा विशेष उल्लेख केंद्र शासनाने २१ एप्रिलच्या पत्रपरिषदेत करताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासकाचे कौतुक केले. त्यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश होता. वाशिम जिल्ह्यात गत १८ दिवसांत एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. तधापि, कोरोना संसर्गाची भीती अद्याप संपलेली नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हे संभाव्य परिस्थितीसाठी आवश्यक सर्व तयारी करीत असल्याचे दिसून येते. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड़ केअर सेंटरसाठी शासकीय ईमारतीची पाहणी करण्यात आली असताना संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी खासगी रूग्णवाहिकांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील काळात कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना अड़चणी येऊन नयेत म्हणून आरोग्य विभाग कोरोना विषाणू संसर्गबाधित किंवा संदिग्ध असणाºयांना तातडीने उपचाराखाली आणण्यासाठी खासगी रूग्णवाहिकांचेही अधिग्रहण करणार आहे. जिल्ह्यात एकूण २८ खासगी रुग्णवाहिका असून, १०८ क्रमांकाच्या ११ व १०२ क्रमांकाच्या ३१ रुग्णवाहिका आहेत.

आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकेचे अधिग्रहण
जिल्ह्यात सद्यस्धितीत १०८ आणि १०२ असे दोन प्रकारा मिळून ४२ शासकीय रूग्णवाहिका, तर २८ खासगी रूग्णवाहिका ऊपलब्ध असून, आवश्यकतेनुसारच खासगी रूग्णवाहिकांचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.


कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यात जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग चोख भूमिका बजावत आहे. पुढील काळात कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना अडचणी येऊ नयेत म्हणून खासगी रुग्णवाहिकांचे अधिग्रहण केले जाणार आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

Web Title: CoronaVirus: Acquisition of private ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.