CoronaVirus in Akola : आणखी चौघांचा मृत्यू; ८९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:00 AM2020-09-22T11:00:28+5:302020-09-22T11:00:35+5:30

आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

CoronaVirus in Akola: Four more die; 89 corona positive | CoronaVirus in Akola : आणखी चौघांचा मृत्यू; ८९ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : आणखी चौघांचा मृत्यू; ८९ कोरोना पॉझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ३६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान सोमवारी १०६ जणांनी कोरोनावर मात केली.
सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, कोरोनामुळे मृतकांचा आकडाही वाढला आहे. सोमवारी आणखी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ६७ जणांचे मृत्यू झाले. सोमवारी दिवसभरात ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील १, नंदिपेठ येथील १, समर्थनगर १, सिव्हील लाईन्स परिसर ५, लाखाळा परिसर ४, शासकीय निवासस्थान परिसर १, जुनी आययुडीपी परिसर १, राधाई ले-आऊट परिसर १, आययुडीपी परिसर १, अकोला नाका परिसर १, शुक्रवार पेठ परिसर १, शहरातील इतर ठिकाणची १, बाभूळगाव येथील १, करंजी येथील १, काटा १, टो येथील ४, खारोळा येथील १, शिरपुटी येथील २, वारला येथील १, काजळंबा येथील १, मोहजा रोड येथील १, रिसोड शहरात ६, रिठद २, कोयाळी १, भोकरखेडा १, गोवर्धन ४, सवड २, मालेगाव शहरातील १९, अमानी १०, एरंडा २, पांगरी नवघरे २, मुंगळा ३, नागरतास १, रामनगर येथील १, जऊळका येथील १, कवरदरी १, कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील १ अशा ८९ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३६४४ झाली असून, यापैकी २७२५ जणांनी कोरोनावर मात केली. आता ८५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी कोविड हॉस्पिटल, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

तीन पुरूष, एका महिलेचा मृत्यू
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली. वाशिम येथील चाणक्य ले-आऊट येथील ६० वर्षीय पुरुष, लाखाळा येथील ७८ वर्षीय महिला, आययुडीपी येथील ४६ वर्षीय पुरुष, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ६७ बळी घेतले आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Four more die; 89 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.