CoronaVirus : नागरिकांचा विनामास्क शहरात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 06:47 PM2020-05-08T18:47:21+5:302020-05-08T18:49:44+5:30
नागरिक शहरातून फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत हे लोकमतने ८ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आणले आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरात कोरोना संसर्गाविषयी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. विनाकारण रस्त्यावर फिरणे, तोंडावर मास्क न बांधणे, विनाकारण गर्दी करणे अशा लोकांवर दंडात्मक कारवाईही केल्या जात आहे. तरी सुध्दा नागरिक शहरातून फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत हे लोकमतने ८ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आणले आहे. यामुळे प्रशासनाच्यावतिने करण्यात येत असलेली कारवाई कठोर व अधीक गतिमान करणे गरजेचे झाले आहे.
कोरोना विषाणू (कोविड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सीमाबंदी, संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांतर्गत प्रशासनाने योजलेल्या उपायांचा भंग करणाºयांवर कारवाई करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. तरी सुध्दा काही नागरिक याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. लोकमतच्यावतिने शहरात फिरुन सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाºयांचा शोध घेण्यात आला असता शहरातील प्रत्येक रस्त्यावर अनेकजण विना मास्क बिनधास्तपणे फिरतांना आढळून आले आहेत.
जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाºयांवर २०० रुपये कारवाई करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्यावतिने विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाºयांना २०० रुपये दंड पोलीसांमार्फत वसूुल केल्या जात आहे.
दिवसभर पोलीस विभागाने दंड केल्यानंतर पोलीसांकडून नगरपरिषदेतील कर विभागाचे कर्मचारी जमा झालेला पैसा गोळा करुन शासनाच्या तिजोरीत जमा करीत आहेत.
मास्क न वापरता कारवाईसाठी पोलीस विभागाच्या कर्मचाºयांसह नगरपरिषदेचे कुणाल कनोजे, संतोष किरळकर , हडपकर व पोलीस विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
- कारवाईची मोहीम कडक करणे गरजेचे
वाशिम नगरपरिषदेच्यावतिने मास्क न वापरणाºयांवर कारवाई केल्या जात आहे. आजपर्यंत शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्याचे अािध्कार पोलीस कर्मचारी यांना देण्यात आले असून दररोज केल्या जात असलेल्या कारवाईतून आलेली रक्कम नगरपरिषदेचे कर्मचारी गोळा करीत आहेत. कारवाई केल्या जात असतांना काही नागरिक शहरात बिनधास्तपणे विना मास्क फिरत आहेत. यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
मास्कचा वापर न करणाºया व्यक्तिवर २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर निघतांना मास्क वापरणे आवश्यक आहे. जे व्यक्ती मास्कचा वापर करुन निघणार नाहीत त्यांच्यावर अधिक कडक कारवाई केल्या जाणार आहे. नागरिकांनी आपले व आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्याकरिता सहकार्य करावे.
-दीपक मोरे
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम