CoronaVirus : परजिल्ह्यातून आलेल्या ५२८ नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:34 PM2020-03-23T18:34:57+5:302020-03-23T18:35:32+5:30
२० ते २३ मार्च या दरम्यान मानोरा व मालेगाव या दोन तालुक्यात ५२८ जणांची आरोग्य तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परदेश, महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर संकलित केली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येणाºया नागरिकांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान मानोरा व मालेगाव या दोन तालुक्यात ५२८ जणांची आरोग्य तपासणी केली.
सध्या सर्व जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असनू, प्रत्येक जणांना खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्र व राज्य सरकारच्यावतीने केले जात आहे. परजिल्ह्यातून मालेगाव तालुक्यात येणाºया नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसून येताच ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान तालुक्यातील २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मालेगाव शहरातील पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेल्यांपैकी केवळ पाच रुग्ण तपासणीसाठी आले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मालेगाव नगरपंचायतने पुणे, मुंबईवरून आलेल्या कोणत्याच माणसांची नोंद ठेवली नाही तसेच त्यांना तपासणीकरिता तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात नेले नाही. मालेगाव शहरातील अनेक युवक-युवती शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरात गेले होते. तर काही नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई गेले होते. आता सर्व जण परत येत असून, तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील नागरिक आरोग्य तपासणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. केवळ पाच जणांनी आरोग्य तपासणी केली आहे.
मानोरा तालुक्यात १५ मार्च ते २३ मार्च या दरम्यान ३२६ जणांची आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. १५ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा दोन जणांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. १८ मार्च रोजी नाशिक येथून आलेले दोन नागरीक, १९ मार्च रोजी पुणे ३३ व मुंबई २३, २० मार्च रोजी पुणे २४, मुंबई २३, औरंगाबाद २, २१ मार्च रोजी पुणे ५९, मुंबई २४, नांदेड २ व अहमदनगर ९, २२ मार्च रोजी पुणे ४३, मुंबई १३, चंद्रपूर १, नागपूर २, जालना २, २३ मार्च रोजी पुणे ४६, मुंबई ९, वर्धा ३, कलकत्ता १, नागपूर ३ अशा एकूण ३२६ जणांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
मालेगाव तालुक्यातील २०२ नागरिकाचंी आरोग्य तपासणी करून गेले. मात्र २५ हजार लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहरात पुणे, मुंबई वरून आलेल्या केवळ ५ व्यक्ती तपासणीकरीता आले होते. बाहेर गावावरून आलेल्यांना काही लक्षणे असली तरी त्यांनी इतर व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. किमान १४ दिवस घरातच राहावे, तपासणी करून घ्यावी.
- डॉ. संदीप वाढवे
ग्रामीण रुग्णालय मालेगाव
नगर पंचायत कार्यालयामार्फत मालेगाव शहरात महानगरातून आलेल्या व्यक्तींची नोंद प्रभागनिहाय घेतली जाणार असून त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी सुद्धा नगर पंचायतमध्ये नोंद करून तपासनी करून घ्यावी. कोणाला अशी काही माहिती असल्यास कळवावे.
- डॉ. विकास खंडारे,
मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव