CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:07 PM2021-03-13T12:07:29+5:302021-03-13T12:07:37+5:30

Washim corona update जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला.

CoronaVirus: One dies in Washim district; 192 newly found patients | CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९२ रुग्ण

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९२ रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला; तर नव्याने १९२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा १० हजार ९०४ झाला असून १२२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
वाशिम शहरातील योजना पार्क येथील २, टिळक चौक येथील १, लाखाळा येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, रोहडा येथील २, अनसिंग येथील २, असोला येथील २, नागठाणा येथील १, ब्रह्मा येथील १, पिंपळगाव येथील १, धानोरा बु. येथील १२, तामसाळा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, कुलकर्णी ले-आऊट येथील १, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील १, राजस्थान चौक येथील १, अकोला रोड येथील १, गणेश मंदिर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील २, पेडगाव येथील ३, पांगरी येथील १, भूर येथील १, सनगाव येथील ४, शेलगाव येथील १, शहापूर येथील ३, नवीन सोनखास येथील २, दाभा येथील १, पोघात येथील १, मालेगाव शहरातील ६, मुसळवाडी येथील १, मेराळडोह येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील १, हळदा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील ३, बस डेपो परिसरातील ८, शहरातील इतर ठिकाणचे १०, केनवड येथील १, मोप येथील १, मांगूळ येथील १, नावली येथील २, निजामपूर येथील १, कारंजा शहरातील तुळजा भवानी नगर येथील १, कीर्तीनगर येथील १, विद्याभारती कॉलनी येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शिंदे नगर येथील १, के एम कॉलेज परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील २, गुरुमंदिर परिसरातील २, रामनाथ हॉस्पिटल परिसरातील १, रेणुका कॉलनी येथील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, भारतीपुरा येथील १, नझुल कॉलनी येथील १, टिळक चौक येथील १, माळीपुरा येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, यशोदा नगर येथील १, गौरीपुरा येथील १, वसंत नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, चवरे लाईन येथील १, अशोक नगर येथील १, रमाबाई कॉलनी येथील १, मेन रोड परिसरातील १, झाशी राणी चौक परिसरातील १, वनदेवी कॉलनी येथील १, बायपास परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील ८, बेंबळा येथील ११, हिवरा लाहे येथील १, कुपटी येथील १, आखतवाडा येथील ८, कामठवाडा येथील १, उंबर्डा येथील १, बेलमंडल येथील १, दुघोरा येथील २, पिंप्री वरघट येथील ४, वडगाव येथील ३, धोत्रा दे. येथील ३, सोमठाणा येथील १, म्हसला येथील ३, धनज येथील १, टाकळी येथील १, मनभा येथील १, चुडी येथील १, वाई येथील १, कामरगाव येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कारंजा येथील ७२ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
(प्रतिनिधी)

Web Title: CoronaVirus: One dies in Washim district; 192 newly found patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.