CoronaVirus : डॉक्टरांनी स्वत:च तयार केले संरक्षक कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:23 AM2020-04-12T11:23:24+5:302020-04-12T11:23:30+5:30
मालेगाव शहरातील डॉक्टरांनी स्वत:च एक विशिष्ट प्रकारची कीट निर्माण करुन रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संरक्षक कीट प्रशासनाकडून मिळत नसल्याने काही खासगी डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा सुध्दा झाली परंतु अद्याप सुरक्षा कीट प्राप्त करण्यात आली नाही. यावर मात करीत मालेगाव शहरातील डॉक्टरांनी स्वत:च एक विशिष्ट प्रकारची कीट निर्माण करुन रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पीपीई कीट (संरक्षक कीट ) मिळाली नसल्याने शहरातील डॉ. माने , डॉ देवळे , डॉ चव्हाण यासह काही जणांनी स्वत: ट्रेलरकडून ट्रीपल लेअर असलेले मास्क व संपूर्ण शरीर झाकल्याजाईल असा ड्रेस तयार करुन घेतला आहे. कोरोना विषाणू संक्रमण वाढतेय . त्यापासून वाचण्यासाठी अत्यंत आवश्यक एन - ९५ मास्कचा सर्वत्र तुटवड आहे . त्यामुळे रुग्ण तपासणीवेळी कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी डॉक्टरांनीही ट्रिपल लेअर मास्कच्या सहायाने विशिष्ट प्रकारचा ड्रेस शिवून घेऊन ढाल केली आहे . थुकणे , शिंकण्यातून बोलताना थुकी अंगावर जाऊ शकते . त्यामुळे त्यापासून बचावासाठी मालेगांवच्या डॉ विवेक माने आणि त्यांच्या मित्र मंडळीनी शक्कल लढविली. त्यांचे मित्र दिलीप महाजन , संतोष तिखे मिळून एक असा ड्रेस तयार केला ज्यात पूर्ण अंग झाकून घेतल्या जाते. एक टोपी आहे ज्यामुळे जंतू डोक्यावर येत नाही चशमा आणि मास्क मुळे तोंड आणि नाक ही सुरक्षित राहते .ही किट त्यांनी स्वत: सह आपल्या दवाखान्यातिल सर्व कर्मचारी यांनाही दिली आहे .
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरंक्षण करण्यासाठी ही किट तयार करून रुग्ण सेवा सूरु आहे , यामुळे फायदा होतों आहे
- डॉ. विवेक माने, मालेगाव
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा देण्यात येत आहे. अत्यावश्यक असल्यासच दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे
- डॉ. सतिष घुगे, मालेगाव