CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात १६३ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट; ११ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:54 AM2020-07-10T10:54:22+5:302020-07-10T10:54:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ८ जुलैपासून कंटेनमेन्ट झोनमध्ये संदिग्ध रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट केली जात असून, दोन दिवसात १६३ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी ११ नमुने पॉझिटिव्ह तर उर्वरीत १५२ निगेटिव्ह असल्याचे निदर्शनात आले. दुसरीकडे जिल्ह्यात २५०० ‘रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध झाल्या असून, पहिल्या टप्प्यात वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव येथील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.
सध्या कोविड रुग्णांच्या चाचणीसाठी अचूकता व एकाच वेळी चार ते पाच तासांच्या कालावधीत ९० नमुने तपासणीची क्षमता असणाऱ्या ‘रिअल टाइम- आरटीपीसीआर’ या प्रणालीचा उपयोग केला जातो. ही चाचणी उत्तम असली, तरी वाढत्या रुग्णसंख्येचा वेग पाहता आणखी जलद गतीने तपासण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘रॅपिड अॅन्टीजन बेस्ड’ तत्त्वावर आधारित चाचणी प्रणालीला मान्यता दिल्याने आता थेट कंटेनमेन्ट झोनमध्येच संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्याला २,५०० ‘रॅपिड अॅन्टीजन बेस्ड’ किट उपलब्ध झाल्या असून, त्या माध्यमातून वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमधून रॅपिड टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली. ८ व ९ जुलै रोजी एकूण १६३ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी ११ जण पॉझिटिव्ह तर उर्वरीत १५२ जण निगेटिव्ह असल्याचे निदर्शनात आले.
अशी होते, रॅपिड टेस्ट
या चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. हा स्त्राव व्हिटीएम (श््र१ं’ ळ१ंल्ल२ाी१ टी्िरं) द्रावणात मिसळला जातो. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला जातो. या पट्टीच्या दुसºया टोकाला एक बारीक गुलाबी रेघ असते. सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे, असे समजले जाते, असे डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.
जिल्ह्याला २५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार वाशिम, मालेगाव व मंगरूळपीर येथील कंटेनमेन्ट झोनमधून तपासणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यास मदत होईल.
- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम