CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:32 PM2020-05-11T16:32:54+5:302020-05-11T16:33:03+5:30

संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

CoronaVirus: Suspicious patients have raised concerns among district residents | CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हयाचा ग्रीन झोनमध्ये समावेश असला तरी परजिल्हयातून आलेले वाशिम रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, दिवसेंदिवस वाढत असलेले संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. याकरिता विशेष खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार असून प्रशासन कौतूकास्पद काम करीत आहे यात तिळमात्र शंका नाही.
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला बहुतांशी यश आले आहे. जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील एकमेव कोराना बाधित रुग्ण व नुकताच वर्धा येथे आढळलेला मंगरुळपीर तालुकयातील रुग्ण वगळता जिल्हयातील नागरिकांना कोरोना विषाणुची लागण झालेली नाही. मालेगाव तालुक्यातील रुग्ण बरा होउन घरी गेला असून मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण वर्धा येथे उपाचर घेत आहे. याव्यतिरिक्त वाशिम जिल्हयात उत्तरप्रदेशमधील एका ट्रकचा क्लिनर ज्याचा कोरोना पॉझिटीव्ह असतांना मृत्यू झाला व त्याच्या संपर्कातील ट्रकचालक जो उपचार घेत आहेत . परंतु प्रशासनाच्यावतिने विशेष खबरदारी घेतल्या जात असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये दिसून येत असला तरी शहरातील दररोज वाढती गर्दी पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे अन्यथा ग्रीन झोनमधून वाशिम जिल्हा रेडझोनमध्ये यायला वेळ लागणार नसल्याची चर्चा होत आहे.
जिल्हयात दररोज चिंता वाढविणाºया व दिलासा देणाºया बातम्या झळकत आहेत. कारंजातील एका कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने पाठविल्यानंतर जिल्हावासियांची चिंता वाढली होती परंतु सर्वाचे अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला. आता मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने या तालुकयाची चिंता वाढली आहे. यांच्या संपर्कातील सात जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले असून संपूर्ण गावाची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. यांचा अहवाल येईपर्यंत जिल्हयावर टांगती तलवार आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. यासोबतच रिसोड तालुकयातील पंचाबा येथील संदिग्ध रुग्णास दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हयात दररोज शेकडो मजुर दाखल होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढलेली दिसून येत आहे.


- परजिल्हयात अडकलेल्या नागरिकांची तपासणी करुन घ्यावी!
वाशिम जिल्हयातील काही मजूर, नागरिक इतर जिल्हयात अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात येण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने अनेक मजूर, नागरिक जिल्हयात दाखल होत आहेत. ते जिल्हयात दाखल झाल्याबरोबर त्यांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. परंतु परस्पर तपासणी न करता कोणी येत असेल तर नागरिकांनी प्रशासनास कळविणे गरजेचे आहे.

Web Title: CoronaVirus: Suspicious patients have raised concerns among district residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.