CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात तीन संदिग्ध; नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 06:14 PM2020-04-29T18:14:34+5:302020-04-29T18:14:46+5:30
वाशिम : २४ एप्रिल रोजी ‘कोरोनामुक्त’ म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यात, महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता ...
वाशिम : २४ एप्रिल रोजी ‘कोरोनामुक्त’ म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यात, महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. ‘हॉट स्पॉट’ एरिया म्हणून परिचित असलेल्या पालघरमधून आलेली एक गर्भवती महिला यासह अन्य दोन अशा एकूण तीन संदिग्ध व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने २९ एप्रिल रोजी अकोला येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर अहवालाकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
अमरावती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती, पालघर येथून आलेली एक गर्भवती महिला तसेच एक ‘सारी’चा रुग्ण अशा एकूण तीन जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. तुर्तास वाशिम जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.