CoronaVirus in Washim : आणखी ११४ पॉझिटिव्ह; ७५ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:48 PM2020-09-13T12:48:45+5:302020-09-13T12:48:53+5:30

११४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६९० वर पोहचली.

CoronaVirus in Washim: 114 more positive; 75 Corona Free! | CoronaVirus in Washim : आणखी ११४ पॉझिटिव्ह; ७५ कोरोनामुक्त !

CoronaVirus in Washim : आणखी ११४ पॉझिटिव्ह; ७५ कोरोनामुक्त !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६९० वर पोहचली. दरम्यान ७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये ११४ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा परिसर १३, अकोला नाका परिसर २, विनायक नगर परिसर १, शिवाजी नगर परिसर १, शुक्रवार पेठ परिसर १, काळे फाईल परिसर ४, काळे हॉस्पिटल परिसर १, सिव्हील लाईन १, महात्मा फुले चौक परिसर २, पाटणी चौक परिसर १, माधव नगर परिसर १, आययुडीपी परिसर १, रेल्वे क्वार्टर परिसर १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहापूर टॉवर परिसर १, धुमका १, देपूळ २, शिरपुटी ७, हिवरा रोहिला २, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे १, सोनाळा १, मानोरा शहरातील १, चोंडी १०, इंझोरी १, दापुरा १, कारंजा लाड शहरातील ८, शेमलाई येथील १, टाकळी येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, सोनखास २, चिंचाळा २, जोगलदरी १, पिंप्री १, शेलूबाजार ६, रिसोड शहरातील ६, देगाव ७, केनवड १२, रिठद १, शेलगाव राजगुरे १, आसेगाव पेन १, येवती येथील १ अशा एकूण ११४ जणांचा समावेश आहे. रुग्णांची एकूण संख्या २६९० वर पोहोचली असून, त्यातील ४९ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १८८४ लोक बरे झाले. शनिवारी ७५ जणांना डिस्चार्ज दिला. आता ७५६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus in Washim: 114 more positive; 75 Corona Free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.