CoronaVirus in Washim : आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:55 AM2020-07-17T10:55:21+5:302020-07-17T10:55:32+5:30

आता कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ३०९ झाली असून, यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus in Washim: 16 more positive; 309 patients | CoronaVirus in Washim : आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०९

CoronaVirus in Washim : आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०९

Next

वाशिम : १६ जुलै रोजी दिवसभरात १६ जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. आता कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या ३०९ झाली असून, यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १६ जुलै रोजी एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केली.
गुरूवारी सकाळी ब्राह्मणवाडा (ता. वाशिम) येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री ७.३० वाजता आणखी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १, पांगरीकुटे (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. मंगरूळपीर शहरातील बाधित व्यक्तींमध्ये बढाईपुरा परिसरातील ५, पठाणपुरा परिसरातील १ व श्रीराम नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी येथील १, सहारा कॉलनी येथील १, इंदिरा नगर १, शिक्षक कॉलनी १ व पोलीस क्वार्टर परिसरातील १ अशा एकूण ५ व्यक्तींना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३०९ झाली असून यापैकी १८२ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२० जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सात जणांचा मृत्यू झाला.

 

Web Title: CoronaVirus in Washim: 16 more positive; 309 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.