CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:36 PM2020-07-11T12:36:15+5:302020-07-11T12:36:25+5:30

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८७ झाली आहे.

CoronaVirus in Washim: 18 positive; 3 people discharged! | CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज!

CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी रात्री एका व्यक्तीचा, तर शुक्रवारी दिवसभरात १७ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८७ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ८३ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. गुरुवारी ९ जुलै रोजी यामध्ये २१ जणांची भर पडली होती. त्यात गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील इंदिरानगर भागातील एका २९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शुक्रवार १० जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता जिल्ह्यातील ८ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर परिसरातील ४ वर्षीय मुलगी, ५४ वर्षीय महिला, सोनखास परिसरातील ३१ वर्षीय महिला, गवळीपुरा परिसरातील ३० वर्षीय व बढाईपुरा परिसरातील ४९ वर्षीय व्यक्ती अशा एकूण ५ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्याशिवाय कारंजा शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, आनंद नगर परिसरातील ५२ वर्षीय महिला व २ वर्षीय मुलगीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याशिवाय सायंकाळी ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ०५ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मालेगाव शहरतील जिल्हा परिषद मराठी शाळा परिसरातील ०३ आणि नागरतास रोड परिसरातील ०१ व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८७ झाली असून, यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८३ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आता कालपर्यंतच्या ११० अहवालातील काही अहवाल गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी प्राप्त झाले, तर उर्वरित अहवालाकडे आरोग्य विभागांचे लक्ष लागले आहे.

मालेगावातील व्यक्तीचा अकोल्यात मृत्यू
मालेगाव शहरातील अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मालेगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मालेगाव नगरपंचायत चे ३ कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने संपूर्ण नगर पंचायतचे कर्मचाऱ्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. मालेगाव शहरात कोरोना पॉझिटीव्ह संख्या ८ झाली आहे.

तीन दिवसात ३९ अहवाल पॉझिटीव्ह
गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३९ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संबंधित परिसरात प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावून नागरिकांचे सर्र्वेक्षण सुरू केले आहे. त्यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ८ व्यक्तींसह गुुरुवारी रात्री पॉझिटिवह आढळून आलेल्या एका व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील लोकांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

Web Title: CoronaVirus in Washim: 18 positive; 3 people discharged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.