Coronavirus in Washim : आणखी ४१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६६१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 11:18 AM2020-08-03T11:18:07+5:302020-08-03T11:19:06+5:30
१ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
वाशिम : १ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये कारंजा शहरातील दामिनी नगर परिसर ४, तुषार नगर परिसर १, पोलीस स्टेशन परिसर ६, वाणीपुरा परिसर १०, भारतीपुरा परिसर २, उंबर्डा बाजार येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे कॉलनी परिसर १, पठाणपुरा परिसर १, शशिमोहन टॉकीज परिसर १ आणि चिखली येथील ४, रिसोड शहरातील गणेश नगर १, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १ व्यक्तीचा समावेश आहे तसेच १ आॅगस्ट रोजी सकाळी वाशिम कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कारंजा लाड शहरातील माळीपुरा परिसरातील ६५ वर्षीय महिलेचाही कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २ आॅगस्ट रोजी सायंकाळी आणखी ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर परिसरात १, सिंधी कॅम्प परिसर १, एम. बी. आश्रम परिसर १, दिल्ली वेस परिसर १ आणि वढवी येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवाजी नगर १, शेलुबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
२६ जणांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसर ५, वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स १, विनायक नगर १, जानकी नगर ४, लाखाळा ३, शुक्रवार पेठ येथील १ यांचा समावेश आहे.
कळंबा महाली येथील ६, मंगरूळपीर शहरातील ताजीपुरा येथील १, तालुक्यातील नांदगाव येथील १, शेलुबाजार येथील १, आसेगाव येथील १, मानोरा तालुक्यातील राहूल पार्क, सोमठाणा येथील १ अशा एकूण २६ व्यक्तींचा समावेश आहे.