CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:21 AM2020-08-12T11:21:06+5:302020-08-12T11:21:18+5:30

मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे.

Coronavirus in Washim: 42 more patients added; 50 Corona Free! | CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त!

CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी ४२ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. सकाळच्या अहवालानुसार, एकूण २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मंगरूळपीर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील ३, कवठळ येथील ७, शेगी येथील ७, कारंजा लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, एकलासपूर येथील ४, वाशिम शहरातील काळे फाईल येथील २, पार्डी आसरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सायंकाळी ७ वाजता प्राप्त अहवालानुसार १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रिसोड शहरातील जिजाऊ नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ४, वाशिम शहरातील गणेशपेठ येथील १, झाकलवाडी येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, सोहळ येथील १, आखतवाडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९९८ झाली.


५० जणांना डिस्चार्ज
मंगळवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. वाशिम शहरातील सप्तशृंगी नगर २, ड्रीमलँड सिटी परिसर २, गवळीपुरा येथील १, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसर १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील काळा कामठा/पिंपळदरा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील ५, गणेशनगर येथील २, ब्राह्मण गल्ली येथील १, पठाणपुरा येथील १, कायंदे सदन परिसर १, हराळ येथील ४, भोकरखेड येथील २, कारंजा लाड शहरातील हातोतीपुरा येथील ७, भारतीपुरा येथील २, मजीदपुरा येथील ६, सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी परिसर ३, रामा सावजी चौक परिसर २, कानडीपुरा येथील १, रविदासनगर १, भामदेवी येथील ३ अशा एकूण ५० व्यक्तींचा समावेश आहे.


३५१ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर एका रुग्णाने आत्महत्या केली. सद्यस्थितीत ३५१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Coronavirus in Washim: 42 more patients added; 50 Corona Free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.