CoronaVirus in Washim : ५०५ रुग्णांची गृह विलगीकरणाला पसंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:18 PM2020-09-23T18:18:53+5:302020-09-23T18:19:14+5:30
यंत्रणेवरील ताण काही अंशी कमी होऊन जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांना वेळेत उपचार करणे अधिक सुलभ झाले.
वाशिम : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतू, सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास नसलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यात गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर ५०५ रुग्णांनी गृह विलगीकरणाला पसंती दिली. गत १५ दिवसात २२८ जणांना डिस्चार्ज मिळाला असून, सध्या २७७ जण गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतल्याने जुलै महिन्यापासून जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तर यामध्ये अधिकच वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. या पृष्ठभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाºया तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वत:साठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करणाºया रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ५०५ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्विकारला असून, यापैकी २२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या २७७ जण गृह विलगीकरणात आहेत. गृह विलगीकरणामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही अंशी कमी होऊन जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांना वेळेत उपचार करणे अधिक सुलभ झाले.