CoronaVirus in Washim : आणखी ५७ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ११९६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:16 AM2020-08-17T11:16:48+5:302020-08-17T11:16:58+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११९६ झाली असून, यापैकी ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी ५७ रुग्णाची भर पडल्याचे १६ आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११९६ झाली असून, यापैकी ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. यामध्ये १५ व १६ आॅगस्ट रोजी एकूण ५७ रुग्णांची भर पडली. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळच्या अहवालानुसार २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसर १, चंडिका वेस परिसर १, स्वामी विवेकानंद नगर लाखाळा परिसर १, बिलाला नगर परिसर १, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर ४, बेलखेडा १, सवड येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसर ३, संभाजी नगर परिसर ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसर ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर येथील एक अशा एकूण २१ जणांचा समावेश आहे. १६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या अहवालानुसार १४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसर १, शेगी येथील ४, गिंभा येथील ६, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, काटीवेश परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील १, वारा जहांगीर येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील १, एकता नगर येथील १, भर जहांगीर येथील १, चिचांबाभर ५, आसेगाव पेन येथील १०, येवती १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या अहवालानुसार २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसर ४, सुंदरवाटिका परिसर १, काळे फाईल परिसर १, मंगरुळपीर येथील पोस्ट आॅफिस मागील परिसर १, कवठळ ५, रिसोड तालुक्यातील शेलू खडसे १, हराळ १, कारंजा लाड शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसर १, चावरे लाईन परिसर २, दादगाव १, शेवती १, कामरगाव ५ जणांचा समावेश आहे.
770 जणांना डिस्चार्ज
रविवारी २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. ११९६ रुग्णांपैकी आतापर्यंत ७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.