Coronavirus in Washim : आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण १४६८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:59 AM2020-08-25T11:59:16+5:302020-08-25T11:59:22+5:30
सोमवार, २४ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ३७ रुग्णांची यामध्ये भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, २४ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ३७ रुग्णांची यामध्ये भर पडली. आता कोरोनाबाधितांची संख्या १४६८ वर पोहोचली आहे. यापैकी ३८७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, सोमवारी २८ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातन सुटी देण्यात आली.
बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अन्य संदिग्धांचे अहवालही पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २४ आॅगस्ट रोजी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील अयोध्यानगर परिसरातील ७, इंदिरा चौक परिसरातील ३, शुक्रवार पेठ परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील ३, इंगोले ले-आऊट परिसरातील २, शिंपी वेताळ परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, अनसिंग येथील १, ढिल्ली येथील ३, वारा जहांगीर येथील २, हिवरा रोहिला येथील १, मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील २, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील ३, साळीपुरा येथील २, वाणीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, काजळेश्वर येथील १ अशा व्यक्तींचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४६८ वर पोहोचली असून, त्यातील २६ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १०५४ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत.
२८ जणांची कोरोनावर मात
वाशिम शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, भरजहांगीर येथील ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर परिसरातील १, शिवनगर येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील ३, मानोरा तालुक्यातील गिंभा येथील १ अशा २८ व्यक्तीला सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.