CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ३९ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 01:10 PM2020-10-04T13:10:48+5:302020-10-04T13:10:58+5:30
CoronaVirus in Washim मालेगाव येथील एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवार, ३ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. दिवसभरात ३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या ४५०२ वर पोहचली. दरम्यान, शनिवारी १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कमी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येते. शनिवारी ३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ अशा ३९ जणांचा समावेश आहे. आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४५०२ झाले असून, यापैकी ३८४१ जणांनी कोरोनावर मात केली. आता ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
मालेगाव येथील इसमाचा मृत्यू
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबळींची संख्या वाढली. मालेगाव येथील एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ९५ जणांचे मृत्यू झाले असून, एका जणाने आत्महत्या केली आहे.