CoronaVirus in Washim : आणखी चौघांचा मृत्यू; ७० पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:49 PM2020-09-07T12:49:05+5:302020-09-07T12:49:11+5:30
७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या २१६३ वर पोहोचली आहे.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे रविवारी दिवसभरात ७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या २१६३ वर पोहोचली आहे. दरम्यान रविवारी ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंंतेत अधिकच भर पडत आहे. रविवारी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी आणखी ७० जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील देवपेठ ४, शुक्रवार पेठ २, योजना पार्क परिसर १, रेखाताई विद्यालय समोरील परिसर १, जिल्हा कारागृह परिसर ३, गोंदेश्वर परिसर १, बाहेती गल्ली परिसर २, सप्तश्रृंगी परिसर २, इनामदारपुरा १, चामुंडादेवी परिसर ३, चांडक ले-आऊट परिसर २, सुपखेला १, भटउमरा १, मालेगाव शहरातील २, मेडशी १, रिसोड शहरातील २, बेंदरवाडी येथील १३, सवड १, महागाव १, वडजी १, करडा १, कारंजा लाड शहरातील रेणूका कॉलनी परिसर १, सिंधी कॅम्प परिसर १, शिवाजी चौक परिसर १, भडशिवणी ३, शेलुवाडा ४, गायवळ १, लाडेगाव १, खानापूर १, पोहा १, इंझोरी १, मंगरुळपीर शहरातील १, नागी १, वनोजा ६, शेलुबाजार येथील १ अशा ७० जणांचा समावेश आहे. आता एकूण रुग्णसंख्या २१६३ वर पोहचली असून, यापैकी १५०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण ६१६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाशिम, रिसोड येथील प्रत्येकी दोघांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. वाशिम शहरातील इनामदारपुरा येथील ७५ वर्षीय महिला, महात्मा फुले चौक परिसरातील ७० वर्षीय महिला, रिसोड शहरातील वाणी गल्ली येथील ७७ वर्षीय पुरुष व पठाणपुरा येथील ६६ वर्षीय महिलेला उपचारादरम्यान ६ सप्टेंबरला रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला असून, एकाने आत्महत्या केली.